Share

सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे सूत्रधार शोधा : फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर अजून एक गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे किंवा परमवीर सिंग हि छोटी माणसं आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत केली आहे. तसेच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIAने आपल्याकडे वर्ग करुन घेण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी वाझे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करताना सरकारला धारेवर धरलं. एटीएसकडे हिरेन प्रकरणाचा तपास गेल्यानंतर एटीएसने वाझेंना अटक करायला हवी होती. वाझेंना अटक करून एटीएसने त्यांना एनआएकडे द्यायला हवं होतं. पण एटीएसने तसं केलं नाही. हिरेन आणि अँटालिया प्रकरण हे एकमेकांशी कनेक्टेड आहे.

त्यामुळे हिरेन प्रकरणाचा एनआयएने तपास करावा, असं सांगतानाच एटीएसवर आमचा अविश्वास नाही असं नाही. एटीएसवर विश्वास आहे. पण ज्या पद्धतीने कारवाई व्हायला हवी होती, तशी या प्रकरणात कारवाई झाली नाही. त्यामुळे हे प्रकरण एनआयएकडे देण्यात यावं, असं त्यांनी सांगितलं.

ही केस सीआययूकडे येण्याचं कारण नव्हतं. बादशाह रॅपर, रितीक रोशन केस असो, सर्व हायप्रोफाईल केसेस सीआययूकडेच जात होत्या. सीपीनंतर कोणाचा वट किंवा कद होता तो सचिन वाझेंचा होता. मुख्यमंत्र्यांच्या जवळ, गृहमंत्र्यांच्या जवळ, किंवा शिवसेना नेत्यांच्या जवळ दिसत. सचिन वाझे यांना वसुली अधिकाऱ्याच्या रुपात बसवण्यात आलं. मुंबईत डान्सबार सुरु ठेवण्यात सूट, आणि सर्वाचे इन्चार्ज सचिन वाझे होते”, असा गंभीर आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!