Share

मद्यधुंद शिक्षकाने शाळेच्या ग्रुपवर पोस्ट केला अश्लील व्हिडिओ

Published On: 

परभणी : दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका शिक्षकाने आपल्या संबंधीत विभागातील व्हाट्सअप ग्रुप मध्ये अश्लील चित्रफित टाकण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्या ग्रुप वर २०० पेक्षा जास्त सदस्य असून, त्यात महिला कर्मचारी सुद्धा आहेत. तरी सुद्धा अजून ही या शिक्षकावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चित्रफीत टाकणारा ‘तो’ शिक्षक दारूच्या नशेत धुंद असल्याचे बोलल्या जात आहे. ज्या ग्रुप वर त्याने चित्रफीत टाकली त्या ग्रुप मध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे ही बोलल्या जात आहे. ती चित्रफीत टाकल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी त्याला तो व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली. काहींनी तर चक्क मध्यरात्री घरी जाऊन सांगितले तरी त्यांनी कुठल्याच विनंतीला प्रतिसाद दिला नाही.

तीन दिवस झाले तरी त्या शिक्षका वर कारवाई होत नाहीये. यातून प्रशासन किती हतबल आहे हे स्पष्ट रित्या समोर येते. त्या ग्रुप मध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असताना एका शिक्षक कडून अश्लील चित्रफीत टाकण्यात येते. तरी ही त्या शिक्षकावर कारवाई कशी होत नाही असा सवाल सध्या विचारला जात आहे. येणाऱ्या दिवसात तरी त्याच्या वर कारवाई होईल का ? असा सवाल सध्या विचारला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!