🕒 1 min read
पुणे : राज्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात असल्याने राज्यातील काही भागात लॉकडाऊन करण्यात आले तर काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले. यातच आता पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा २ हजारच्या जवळ आला आहे. जर कोरोना रुग्णांचे हे प्रमाण असेच वाढत राहिल्यास शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांवर उपचारासाठी पुन्हा सुरू केले जाणार आहे.
दिल्ली आयआयटीने हे सेंटर आणखी तीन महिने वापरता येणार असल्याचा अहवाल दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने हे सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यानंतर समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात या रुग्णालयासाठी ७० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातील ३७ कोटींचा निधी शिल्लक असून या निधीतून या हॉस्पिटलचा पुढील तीन महिन्यांचा खर्च केला जाणार आहे.
मात्र, येथे आवश्यक यंत्रणा उभारण्यास १० ते १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेस या ठिकाणी केवळ २ महिनेच रुग्ण ठेवता येणार आहेत. सुरूवातीला २०० बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शहरात शासकीय रुग्णालयातील बेड जवळपास संपलेले असल्याने, जम्बो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु हे जम्बो कोविड सेंटर केवळ २ महिने उपलब्ध होऊ शकत असल्याने पुढे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लस द्यावी; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
- आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण
- तैमुर बनला कुक; आई करीनाने केले कौतुक
- डुकाटीच्या दोन शानदार बाईक्स ग्राहकांच्या भेटीला जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- हर्षद मेहतावर आधारित अभिषेक बच्चनच्या ‘बिग बुल’चा टीझर प्रदर्शित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
