जालना : जालना येथील प्लास्टिक व कटलरीच्या गोदामाला मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. या आगीला विझवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले. शेवटी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांला यश आले असं जाहीर होताच. पुन्हा त्या गोदामाला आग लागली. त्यामुळे गोदामातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अग्निशमन दलाच्या तब्बल आठ पाण्याच्या गाड्यांचा वापर आग विझवण्याच्या कामात करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकरी घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर आग विझवण्याचे काम सुरु होते. आग विझल्यानंतर काही काळाने पुन्हा आग लागण्याची विचित्र घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली होती.
कारखान्यात आग लागल्याची ही एक दुर्दैवी घटना आहे. सुदैवाने या घटनेमुळे कोणाला ही आपला जीव गमावला नसला तरी आग मात्र फार भीषण होती. त्यामुळे या घटनेची चर्चा संपूर्ण जालना जिल्ह्यात सुरु होती. या घटनेत १० लाखाचे कटलरी सामान जाळून खाक झाले आहे. मात्र आग लागण्याचे कारण अजून ही स्पष्ट नसल्याचे सांगितल्या जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- डुकाटीच्या दोन शानदार बाईक्स ग्राहकांच्या भेटीला जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- हर्षद मेहतावर आधारित अभिषेक बच्चनच्या ‘बिग बुल’चा टीझर प्रदर्शित
- बीडच्या अधिकाऱ्यांवर सुनिल केंद्रेकर संतापले, म्हणाले ‘सुधरा रे,अन्यथा..’
- मनसुख हिरेन यांची हत्या ठाकरे सरकारच्या वाझे गँगने केली
- राज्यातील सत्तेची पुनरावृत्ती होणार ? शिवसेना भाजपला आणखी एक धक्का देण्यास सज्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
