🕒 1 min read
मुंबई : तरुणाई मध्ये आणि बाईक रायडर्स यांच्या कडून विशेष पसंती असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध असतात तसेच वाहन निर्मिती क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असतात. अद्यायावत तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या वाहनांमध्ये डुकाटी कंपनीच्या बाईक तरुणांकडून पसंत केल्या जातात आता देखील कंपनीने दोन बाईक सादर केल्या आहेत.
डुकाटीने भारतात बीएस 6 मॉडेल असलेल्या दोन आलिशान बाईक स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट आणि स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेड लाँच केल्या आहेत. डुकाटी स्क्रॅम्बलर किंमत 9.80 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) आहे तर डुकाटी स्क्रॅम्बलर डेझर्ट स्ले़ड या बाईकची किंमत 10.89 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) इतकी आहे. नवीन स्क्रॅम्बलर्स आता डुकाटी डीलरशिपकडे बुक केल्या जाऊ शकतात आणि त्यांचे वितरणही (डिलीव्हरी) लवकरच सुरू होईल.
डुकाटी स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट आणि डुकाटी स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेडमध्ये समान 803 सीसी, एल-ट्विन, टू-व्हॉल्व्ह इंजिन आहे जे 8,250 आरपीएम वर 73 बीएचपी पॉवर आणि 5,750 आरपीएम वर 66.2 एनएम पीक टॉर्क उत्पन्न करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सससह सुसज्ज आहे. स्क्रॅम्बलर नाइटशिफ्ट स्टील ट्रेलिस फ्रेमसह येते आणि ही बाईक सुपर टायरवाल्या स्पोक व्हिल्सने सुसज्ज आहे. स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेडमध्ये 46 मिमी फोर्क आणि 200 मिमी एक्सकर्सनसह अॅडजस्टेबल सस्पेन्शन आहे.
डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्र म्हणाले की, “आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की, सर्व दुचाकीस्वार त्यांच्या नवीन ड्रायव्हिंग कौशल्यांना आव्हान देण्यासाठी आणि स्क्रॅम्ब्लरचे मालक होण्याचे स्वप्न साध्य करण्यासाठी या नवीन मोटारसायकलला भरभरून प्रतिसाद देतील.
स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट आणि स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेड दोन्ही बाईक सारख्याच इंजिनासह सादर करण्यात आल्या असून 6-स्पीड गिअरबॉक्ससह येतात. दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, कोची, कोलकाता आणि चेन्नईमध्ये सर्व डुकाटी डिलरशिप्सकडे नवीन स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट आणि स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेडसाठी बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. लवकरच या मोटारसायकलींचे वितरण सुरु होणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
- विविध क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शरद पवार यांना डी. लिट पदवी देण्याचा ठराव मंजूर
- कर्णधार कोहलीच्या ‘या’ निर्णयावर लक्ष्मणची नाराजी
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १००% माफ; परभणी मनपाचा निर्णय
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
