बीड : मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना पोलिसांच्या गाडी बीड तालुक्यातील शिरपूरजवळ अपघात झाला. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती कळताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.
बीड तालुक्यातील उखंडा तलावाजवळ नगर रोडवर मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री घडली. बीड पोलीस पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री पोलिसांच्या गाडीला बीडजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये सात पोलीस जखमी झाले आहेत. एपीआय अशोक धांडे (५७), हे.कॉ.राजेंद्र शिंदे (५५), पोलीस चालक प्रताप घोडके (४७), उमा उद्धव मोरे (४०), लक्ष्मण मोरे (५०), तेजस मोरे (१५), आनंद मोरे (२५) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.
अपघाताची माहिती कळताच शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे यांनी जयंत वाघ, शिवराज धांडे, हेमंत वाघ, पंकज धांडे, शाम धांडे, अजिंक्य धांडे, गणेश झुंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खाजगी वाहनामध्ये त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयामध्ये दाखल केले. यात तीन पोलीस कर्मचारी आणि चार नागरिक जखमी आहेत. वेळेवर मदत व उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फाइलबाबत विचारल्याने महिला लिपिकाने वाहनधारकाला सॅन्डलने झोडपले
- ‘सर्वच नव्हे, ‘या’ सरकारी बँकांचेच होणार खासगीकरण’, सीतारमण यांची महत्त्वाची माहिती
- ‘स्व.गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाला सक्षम केले हा पंकजांचा गैरसमज’, नामदेव शास्त्री महाराजांची टीका
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
- ‘या’ चुकामुळे झाला भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
