Share

फाइलबाबत विचारल्याने महिला लिपिकाने वाहनधारकाला सॅन्डलने झोडपले

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीडमधील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या राम भरोसे सुरू आहे. एजंटाचा अधिकचा वावर, अधिकाऱ्यांची संख्या कमी, आहे ते अधिकारी गैरहजर राहत असल्याने वाहनधारकांची कामे नेहमीच खोळंबलेली असतात. मात्र, या ठिकाणी एक अजब घटना घडली आहे. महिनाभर फाइल अडवून ठेवली आणि कामही मार्गी लावले नाही, याची विचारणा करत अपशब्द वापरणाऱ्या वाहनधारकाला आरटीओ कार्यालयातील एका महिला लिपिकाने चपलाने मारहाण केली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बीड शहराजवळील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या प्रभारी राज सुरू आहे. या ठिकाणी पूर्णवेळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारीच नाही. त्याच बरोबर काही मोटार वाहन निरीक्षक औरंगाबादहून ये-जा करतात. चार चाकी गाड्यांच्या वाहन हस्तांतरणाची कामे तर दोन-दोन महिने होतच नाहीत. बीड जिल्ह्यातील वाहनचालक नेहमीच या कार्यालयाच दररोज चकरा मारत आहेत. मंगळवारी दुपारी २ वाजता बीड येथील एका वाहनधारकाने महिनाभरापासून बीडच्या घोसापुरी शिवारातील आरटीओ कार्यालयातील एका महिला लिपिकास कागदपत्रे दिली होती.

कागदपत्रे दिल्यानंतर सदरील वाहनधारक तीन दिवसांआड येऊन कामाची विचारणा करत होता. परंतु महिला कर्मचारी ही वाहनचालकास प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फिरोज शेख यांच्याकडे कागदपत्रे दिल्याचे सांगत होत्या. मंगळवारी मात्र आरटीओ शेख आणि महिला लिपिक आरटीओ कार्यालयात ड्यूटीवर असल्याने त्या वाहनधारकाने शेख यांना माझ्या कामाचे काय झाले, अशी विचारणा केली केली. तेव्हा शेख यांनी कागदपत्रे पोहोचली नसल्याचे सांगितले.

तेव्हा वाहनधारकाने महिला लिपिकाकडे जाऊन याबाबत विचारणा केली असता मला तेवढं एकच काम नाही म्हणत टाळाटाळ केली. माझे काम जर होत नसेल तर माझी फाइल परत द्या, अशी मागणी वाहनधारकाने महिला कर्मचाऱ्याकडे करत अपशब्द वापरले. तेव्हा महिला लिपिकाने चक्क वाहनधारकास चपलेने प्रसाद दिला. दरम्यान, या प्रकाराची चांगलीच चर्चा होत आहे. आणि त्यामुळे आरटीओतील अधिकाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!