Share

लसीकरणाच्या अंमलबजावणीत राज्य सरकारचा हलगर्जीपणा; लोणीकरांचे थेट पंतप्रधानांना पत्र

Published On: 

जालना: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य सरकार कमालीचा हलगर्जीपणा करत आहे. लसीकरण व्यवस्थित होत नसल्याने राज्य पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे हे एक कारण असण्याची शक्यता माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवार पासून पाहणी दौऱ्यात जिल्ह्यातील जालना, परतूर व मंठा येथील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर लोणीकरांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहीत राज्य सरकारच्या कामावर टीका केली.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण “आयएमसीआर “ या केन्द्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे. की, नाही यावर कठोर लक्ष ठेवणारी फिरती पथके केन्द्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने तयार करावीत व त्यांनी या लसीकरण प्रक्रियेवर कडक नजर ठेवावी. अशी मागणी लोणीकर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!