🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा ८ गडी राखुन दणदणीत पराभव करत जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयानंतर ५ सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी बढत मिळवली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात जोस बटलरने नाबाद ८३ धावा करत इंग्लंडला विजयी केले.
दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर आत्मविश्वासाने मैदानात उतरल्यानंतर नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताच्या डावाची पुन्हा एकदा निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा भोपळा फोडून माघारी परतला. या सामन्यात पुनरागमन करणारा सलामीवीर रोहित शर्मा आणि मागील सामन्यातील सामनावीर इशान किशन स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पंतच्या साहाय्याने संघाचा डाव सावरत अर्धशतक झळकावले. निर्धारित २० षटकांत भारताने कोहलीच्या ७७ धावांच्या मदतीने इंग्लंडसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले.
धावांचा पाठलाग करताना फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिला गडी स्वस्तात गमावल्यानंतर सलामीवीर जोस बटलरने आक्रमक खेळी करत ५२ चेंडुतच ८३ धावा फटकावल्या आणि भारतीय गोलंदाजीची हवाच काढून घेतली. या खेळी दरम्यान त्याने पाच चौकार आणि चार षटकार लगावले. विजयी खेळी करणाऱ्या जोस बटलरला सामनावीर म्हणुन गौरवीण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन
- स्वारातीम’ विद्यापीठाच्या अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी
- शेतकर्यांचे पैसे खाणार्यांना निवडून देणार का? : भाऊसाहेब पाटील चिकटगावकर
- आण्णा नाईक परत येत आहे! मालिकेचा प्रोमो सोशल मिडीयावर व्हायरल
- सोनाली कुलकर्णीचा नवा सिनेमा ‘हाकामारी’; समिर विद्वांस करणार दिग्दर्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
