🕒 1 min read
मुंबई : झी-मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. या मालिकेतील पात्रेही प्रेक्षकांनी चागंलीच डोक्यावर घेतली. आता पर्यंत या मालिकेचे दोन भाग प्रदर्शित झालेले आहेत आणि नुकताच या मालिकेच्या तिसऱ्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि या प्रोमोने सोशल मीडीयावर चांगलाच धुमाकूळ घातला.
झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून ही मालिका कधीपासून सुरू होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेतील मालवणी भाषेमुळे या मालिकेची कोकणात वेगळीच लोकप्रियता आहे. अण्णा नाईक परत येणार..असे प्रोमोज सध्या झी मराठीवर झळकतायत. त्यातील मुंबईच्या लोकलमधला प्रोमो चांगलाच लोकप्रिय ठरला आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागात अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुस-या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले होते. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या पहिल्या आणि दुस-या भागातील अनेक कलाकार या तिस-या भागातही दिसणार आहेत. तसेच या तिस-या भागात काही नवीन कलाकारांची एंट्री होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आंधळं दळतंय..! मनपा पथकाची दादागिरी, परवानगी असलेल्या प्लास्टिकलाही लावला दंड
- रेल्वेचं खासगीकरण होणार? रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिल ‘हे’ उत्तर
- हिंमत असेल तर फडणवीसांची चौकशी कराचं ! भाजपचं खुलं आव्हान
- सचिन वाझेंमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात ? शरद पवारांनी केलं महत्वाचं विधान
- परभणीतून रेल्वेद्वारे अडीच हजार टन सोयाबीन गुजराथला रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
