Share

आंधळं दळतंय..! मनपा पथकाची दादागिरी, परवानगी असलेल्या प्लास्टिकलाही लावला दंड

Published On: 

औरंगाबाद : उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरणार्‍या प्लास्टिकला बंदीतून वगळलेले आहे. असे असतानाही महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने अंगुरीबागेतील व्यापार्‍याला ५ हजारांचा दंड लावला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्लास्टिक बंदीच्या नावाखाली चूकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याने शहरातील व्यापारी त्रस्त आहेत. अंगुरीबाग येथील एका व्यापार्‍याकडे मुरमुरा पॅकिंग ६० मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिकमध्ये असतानाही येथील व्यापार्‍यास ५ हजारांचा दंड केला आहे. पालिकेचे पथक मनमानी पद्धतीने कारवाई करत असल्याचे संबंधित व्यापार्‍याने म्हटले आहे.

शासन आदेशान्वये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र यात उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरणार्‍या प्लास्टिकला वगळण्यात आले आहे. शहरातील अंगुरीबाग येथील मार्केेटमध्ये गणेश पगारिया यांचे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात सोमवारी पालिकेच्या नागरी मित्र पथकाने धडक दिली. तेव्हा मुरमुरा पॅकिग ही ५० मायक्रॉनपेक्षा कमी असल्याचे म्हणत पथकाने पगारीया यांना पाच हजार रूपये दंडाची पावती दिली.

उलट शासनाच्या जीआर दाखवत सक्‍तीने पाच हजार रूपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल केल्याचे पगारिया यांनी सांगितले. पालिकेने पथक प्लास्टिक बंदीच्या नावाखाली मनमानी करत व्यापार्‍यांना त्रास देत आहे. त्यामुळे यासदंर्भात व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन तक्रार करणार आहे.

आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातय
मनपाचा सध्या अजब कारभार सुरू आहे. कारवाईच्या नावाखाली कोणाकडूनही दंड वसूल करण्याचा सपाटा मनपाच्या नागरी मित्र पथकाने लावल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे अनेकदा अशा घटना समोर येऊनही मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. केवळ मनपाच्या तिजोरीत पैसा जमा होत असल्याने याकडे अर्थपूर्ण डोळेझाक होतेय की काय असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. शिवाय या कारवाई करणाऱ्या पथकांना नियमांचीच चांगल्यापैकी ओळख करून द्यावी असा सल्लाही देण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!