Share

कॉंग्रेसला सोडचिठी देत ‘या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केरळमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे पीसी चाको यांनी राजीनामा दिला होता. चाको यांनी गेल्या आठवड्यात राजीनाम्याची घोषणा केली होती.

दरम्यान, आता पीसी चाको नव्या इनिंगला सुरुवात झाली असून त्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. यातच केरळमधील पी. सी. चाको यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला रामराम केला होता. चाको हे मूळचे केरळचे आहेत. तेथील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाको यांनी, काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून पक्षाला सोड चिठ्ठी दिली होती.

आज, त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली. यानिमित्त दिल्लीत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

पीसी चाको यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीत प्रवेश करताना मला आनंद होत आहे असं चाको यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!