Share

प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोनी टिव्ही मराठी वर सुरु असलेल्या डान्स रिएॅलीटी शो ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. प्रथमेश मानेने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रथमेशने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रथमेशने विजयाचे श्रेय आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दिलं आहे.

प्रथमेशने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘ इतक्या दिवसांपासून मी जे स्वप्न पाहत होतो, ते आज पूर्ण झालं आणि मी तुमच्या सर्वांची मने जिकंली आहेत. या सर्वांच श्रेय तुमचं आहे. आज मला माझ्या आयुष्यात सर्वकाही मिळाले असे वाटत आहे. तुम्ही दिलेल्या मतांसाठी मी सर्वांचा कृतज्ञ आहे. सर्वांसाठी हा विजय आहे,’ असंही प्रथमेशने म्हटलं आहे. याशिवाय प्रथमेशने आकाश शेट्टी आणि अंकित मिश्रा यांचे खास आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/p/CMZ_LUJJIXa/

मागील काही दिवसांपासून सोनी मराठी चॅनेलवर ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’ शो सुरू होता. अखेर १४ मार्च रोजी या शोच्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’ शो च्या ग्रँड फिनालेमध्ये प्राची प्रजापती, दीपक हुलसुरे, अपेक्षा लोंढे, प्रथमेश माने आणि आदिती जाधव यांचा समावेश होता. ग्रँड फिनालेच्या निमित्ताने या शोमध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी उपस्थिती लावली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!