🕒 1 min read
औरंगाबाद : तत्कालीन भाजप सरकारने वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी दिलेल्या पाच कोटींच्या निधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी मंडळींनी गैरव्यवहार केला. त्यामुळे ही योजना बंदच असुन शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर तसाच आहे. मग शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्यांना पुन्हा निवडुन देणार का असा प्रश्न विरोधकांनी सोमवारी उपस्थित केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे, विद्यमान अध्यक्ष नितिन पाटील यांच्या सत्ताधारी पॅनलला शह देण्यासाठी माजी आ. सुभाष झांबड, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलची स्थापना करण्यात आली असुन यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी बँक निवणुकीच्या पार्श्वभुमीवर एकत्र येत वैजापूर मर्चंट बँकेच्या सभागृहात सोमवारी माहिती दिली.
या निवडणुकीत तालुक्यातुन ज्ञानेश्वर जगताप हे सोसायटी मतदारसंघातुन, बिगर शेती संस्थेतुन एकनाथ जाधव व पार्वती जाधव महिला राखीव मतदार संघातुन उभे आहेत. सोसायटी मतदार संघातुन माजी खासदार दिवंगत रामकृष्ण बाबा पाटील यांचे चिरंजीव आप्पासाहेब पाटील हे प्रतिस्पर्धी उमेदवारांपैकी एक असुन ते सत्ताधारी पॅनलचे आहेत. मात्र ते पैठणला राहुन वैजापुरची निवडणुक लढवतात. ते बँकेच्या सभासदांना ओळखतही नाहीत. स्वतःच्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांना गावकऱ्यांनी नाकारले असे चिकटगावकर म्हणाले. वैजापूर तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
संचालक ठरवतील तो चेअरमन
जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलने चेअरमनपदासाठी विद्यमान चेअरमन नितिन पाटील यांचे नाव आधीच घोषित करुन आपल्या पॅनलचे वजन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभुमीवर आम्ही चेअरमनपदासाठी आधीच नाव घोषित करणार नाही.संचालक ठरवतील तोच आमचा चेअरमन असेल असे सुभाष झांबड यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही चेन्नई-मुंबईची टस्सल !
- आज साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश रॅली, आंदोलक जाणार थेट शरद पवारांच्या दारी
- सलमानने दखल घेतलेल्या कमी उंचीच्या तरुणासमोर लग्नासाठी लागल्या मुलींच्या रांगा
- विद्यार्थी आंदोलनाचा पोलिसांना फटका, बंदोबस्ताला असणाऱ्या ५ पोलिसांना कोरोनाची लागण
- गुजराती भाषिक मतदारांना आकर्षित करणारी मनसेची नवी मोहीम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
