बीड: राज्यात कोरोना वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनही काही महत्वाची पावले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून वडवणी येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहरातील व ग्रामीण भागातील ८४ दुचाकीचालकांवर करून ४२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुचाकीवर प्रवास करत असताना मास्क न लावणाऱ्यांवर व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली.
शहरासह ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था बेकायदेशीर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वडवणी ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसात विनामास्क ८४ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायदा तसेच भादंविनुसार विविध कलमाप्रमाणे ही कारवाई करण्यात आली. रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना व बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाऊ नये. मास्क वापरणे अनिवार्य असताना सुद्धा नागरिक खबरदारी घेत नसल्याचे दिसून आले.
राज्यासह बीड मध्ये सुद्धा कोरोना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस कारवाई करत आहे. पण तालुक्यातील तब्बल ४८ गावांसाठी एकच पोलीस ठाणे असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. मात्र शहरात विनामास्क आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना कसरत करावी लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ भाजप खासदाराच्या सुनेने केला जीवन संपविण्याचा प्रयत्न
- धोनी म्हणतो लालच इज कुल; आयपीएल १४ चा प्रोमो प्रदर्शित
- रॅलीनंतर कमल हसन यांच्या गाडीवर हल्ला ; आरोपी अटकेत
- ऐन उन्हाळ्यात एसी, फ्रिजच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ
- ‘कृषी कायद्यामुळं शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशी संसदही अस्वस्थ आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
