Share

रॅलीनंतर कमल हसन यांच्या गाडीवर हल्ला ; आरोपी अटकेत

Published On: 

कांचीपूरम : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे.

यातच मक्कल निधी मय्यमचे प्रमुख अभिनेते कमल हासन यंदा प्रथमच स्वतंत्र पक्षासह विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोईम्बतूर दक्षिण  मतदारसंघातून हासन निवडणूक लढवणार आहेत. अशात आता हासन यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हासन निवडणूक प्रचारानंतर कांचीपूरममधील एका हॉटेलमध्ये जात होते. आतापर्यंत मिळालेल्या वृत्तानुसार, हासन यांना दुखापत झालेली नाही, मात्र या हल्ल्यात गाडीचं भरपूर नुकसान झालं आहे.

कमल हासन यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी तरुणाला पकडण्यात आलं असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एमएनएमचे नेते ए.जी मौर्य यांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे. मौर्य यांनी ट्वीट करत म्हटलं, की हासन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. हासन यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आरोपी दारुच्या नशेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी आरोपीला मारहाण केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात दाखल केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!