Share

‘सत्य बाहेर आलं तर सरकार पडेल’; सचिन वाझेप्रकरणात कंगनाची उडी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या संपूर्ण राज्यभरात सध्या एका पोलीस अधिकाऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. मनसुख हिरेन प्रकरणी भाजपने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली.

या अटकेवर उलट-सुलट चर्चा सुरु असतानाच नेहमीच प्रत्येक प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत असलेली अभिनेत्री कंगना रणौत हिनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सचिन वाझे प्रकरणासाठी शिवसेनेला जबाबदार धरलं आहे. त्यांच्या विरोधात मोठं कारस्थान शिजत असल्याचा आरोप तिनं केला आहे.

‘माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतरच या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकतं. माझ्याविरोधात आणखी 200 गुन्हे लागू शकतात. याची मानसिक तयारी देखील मी केली आहे. जय हिंद.’ अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं सचिन वाझे प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!