🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे त्यांनी दोन डोस घेतलेले आहेत. त्यानंतरही त्यांचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
डॉ. कानन येळीकर यांनी ३० जानेवारी रोजी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. दरम्यान, ११ मार्च रोजी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल शुक्रवारी कोरोना पाॅझिटिव्ह आला. उपचारासाठी त्यांना घाटीत दाखल करण्यात येणार होते.
मात्र, घाटीत ऑक्सिजन बेड्स आहेत. कारण येथे गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. डाॅ. येळीकर यांना कोणताही त्रास नाही. एखादा ऑक्सिजन बेड वाया घालविण्यापेक्षा तो गरजू रुग्णाला मिळाला पाहिजे, यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार त्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. येळीकर यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सशर्त अटींसह औरंगाबादेत होम आयसोलेशनला आता परवानगी
- पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली कोरोनाची लस
- एमपीएससीच्या खेळखंडोबा करत महाविकास आघाडी सरकार युवकांच्या भावनेशी का खेळतं?
- नितीन राऊत एकतर्फी निर्णय घेतात; नागपुरात लॉकडाऊनवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
- सामान्यांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या मनपाने महावितरणचेच थकवले होते कोटी रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
