🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर जात असल्याने आता महापालिकेने आता होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आणला आहे. साठ वर्षांखालील व कमी लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीचे होम आयसोलेशन (घरातच विलगीकरण) करण्याचे आदेश प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत.
प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. साठ वर्षाखालील ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा हवी आहे, त्यांना फिजिशियनने केलेल्या शिफारशीशिवाय ही सुविधा मिळणार नाही. कोऑर्बीट आजार नसलेल्या (मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, किडणी आदी स्वरूपाचे आजार) व्यक्तींना होम आयसोलेशन करण्यात यावे.
सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींनी खासगी वैद्यकीय व्यावसायिक (फिजिशियन) एम.डी. (मेडिसीन) यांच्या आधिपत्याखालील उपचार घेण्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांची आवश्यकतेनुसार प्राथमिक तपासणी (रक्त तपासणी, एक्स- रे इतर तपासणी) आवश्यकतेनुसार करावी.
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गरजेनुसार रुग्णास रुग्णालयात भरती करावे, त्याची संपूर्ण जबाबदारी खासगी वैद्यकीय व्यावसायिकाची असणार आहे. रुग्णास दहा दिवस देखरेख आवश्यक असेल. व्हिडिओ कॉल, फोनव्दारे किंवा प्रत्यक्ष भेटून उपचार करू शकतात असे प्रशासकांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नितीन राऊत एकतर्फी निर्णय घेतात; नागपुरात लॉकडाऊनवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
- सामान्यांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या मनपाने महावितरणचेच थकवले होते कोटी रुपये
- महत्त्वाचे! नोटरीद्वारे व्यवहार करतानाही मुद्रांक शुल्क भरावे लागणार?
- व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचणीसाठी मनपाची सहा पथके तैनात
- घाम पुसण्यासाठी मास्क खाली केला तरी होतोय दंड!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
