Share

नितीन राऊत एकतर्फी निर्णय घेतात; नागपुरात लॉकडाऊनवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने

Published On: 

नागपूर : राज्यात सद्या कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. गेल्या काही महिन्यांत कोरोना वाढीचे प्रमाण आटोक्यात आल्याने जनजीवन सुरळीत झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने कडक निर्बंध लावण्यात येत आहेत.

अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये देखील आज आणि उद्या विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. इतकच नाही तर, 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. म्हणजेच आज पासून सुरु झालेला लॉकडाऊन आता २१ मार्चलाच संपणार आहे. याबाबत नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आदेश दिले आहेत.

मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री नितीन राऊत यांच्या निर्णयावर आक्षेप घेत लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन लावताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला गेला. लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली असती तर अनेक पर्याय पुढं आले असते. ज्या प्रमाणे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन योग्य निर्णय घेतला. त्याचप्रमाणे नागपुरात अपेक्षित होते. मात्र, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे एकतर्फी निर्णय घेतात,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!