Share

२ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर :  सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात १९ मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी  यांनी केली आहे. ‘२ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय, राज्य सरकारकडून अचानक वीजबिल सक्ती केली जातेय. मात्र सर्वसामान्यांनी पैसे कुठून आणायचे?,’ असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.

कोल्हापुरात सक्तीच्या वीज वसुली विरोधात सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. वीज बिल वसुलीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ‘राज्य सरकार अशी अचानक सक्ती करुच कसं शकतं? यामुळे दोन मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्य जनतेचा जीव जातोय. अशी अचानक सक्ती केली जातेय तर पैसे आणायचे कुठून? त्यामुळे ग्राहकांना वीज बिल भरायला एक महिन्याचा वेळ द्यायला हवा,’ अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

लॉकडाऊन काळातील वीजबिल सरकारने माफ करावे ही मागणी आमची आजही ठाम आहे. ‘१९ मार्चला महाराष्ट्रात पाहिल्यांदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.’ अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. तर, ‘१९ मार्चच्या या आंदोलनात सर्वसामान्य जनतेचा रोष दिसेल. सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन राज्य सरकारवर नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी,’ असंही राजू शेट्टी म्हणाले.

पुढे त्यांनी शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे अशी मागणी देखील केली आहे. ‘राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. तर, एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही. लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रातील १ कोटी ३५ लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे,’ असं भाष्य करत त्यांनी राज्य सरकारला इशाराच दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!