🕒 1 min read
लातूर : मागील वीस वर्षांपासून प्रलंबित असलेले कोकळगाव -सरवडी रस्त्याचे काम आता तरी होईल का असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. कोकळगाव येथील शेतकऱ्यांना निम्न तेरणा कालव्यातून ये-जा करण्यासाठी रस्ता सोडण्यात आला नसल्याने या शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी व शेती कामाचे वाहने घेवून ये-जा करता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत असून गेल्या २० वर्षांपासून, हे काम प्रलंबित आहे.
कोकळगाव ते सरवडी दरम्यान मधोमध निम्न तेरणा धरणाचा कालवा गेला आहे. सदरील काम करत असताना शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता सोडणे आवश्यक असताना रस्ता सोडण्यात आला नाही. जमीनीपासुन कालव्याची उंची जवळपास १५ मिटरवर आहे. या भागातील जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्याच्या दुसर्या बाजूला आसल्याने शेतकऱ्यांना १ किलोमीटर पडणारे अंतर रस्ता नसल्याने ६ किलोमीटर वळसा घालून जावे लागते.
तेथे रस्ता नसल्याने शेती उपयोगी वाहने शेतात जात नसल्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पीकांची राशी कराव्या लागतात. कालव्या मधुन रस्ता व्हावा या मागणीसाठी शेतकरी मागच्या २० वर्षापासून संबंधित विभागाला पत्र व्यवहार करत आहेत. अनेकदा आंदोलन उपोषण करण्यात आले परंतु हा प्रश्न सुटला नाही. या २० वर्षांपासून प्रलंबित प्रश्नासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी कालवा परिसरात अधिकाऱ्यांसह बैठक घेत येत्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लावण्यची सूचना केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लाज वाटली पाहिजे तुम्हाला…तुम्हा भाजपा नेत्यांचा पोलीस बांधवांवर एवढा राग का आहे ?
- ३१ मार्चपर्यंत शाळा बंद; नाशिक जिल्ह्यातही कडक निर्बंध
- बीएमडब्ल्यू खरेदी करण्याचे स्वप्न होणार साकार ‘BMW JOY Days’ मध्ये नवी ऑफर
- ‘सायना’ चित्रपटाचं थीम साँग लॉन्च
- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर तब्बल १५० कोटी खर्च करूनही सायबर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
