Share

राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे – नितेश राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर, राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आलं होतं.

आता या परीक्षेची नवी तारीख आयोगाने जाहीर केली आहे. पूर्व-नियोजित १४ मार्च ऐवजी ही परीक्षा आता ७ दिवसानंतर म्हणजेच २१ मार्च रोजी घेतली जाईल असे आदेश आयोगाने दिले आहेत. मात्र, बहुसंख्य विद्यार्थी हे गरीब कुटुंबातून येतात. त्यांना मोठ्या शहरात आता अतिरिक्त ७ दिवस रहावे लागणार आहे. तसेच, अनेक विद्यार्थ्यांना आरक्षित तिकिटाचा तोटा देखील सहन करावा लागणार आहे.

यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी भाष्य करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘हॉल तिकीट कशाला काढली? विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन ढासळलं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान सरकार भरून देणार का? राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी,’ अशी मागणी नितेश राणे यांनी केलं आहे.

‘पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. जेव्हा भ्रष्टाचार करायचा असतो. टेंडर पास करायचे असते, तेव्हा सरकारमधील लोकांचा ताळमेळ चांगला असतो, राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे,’ अशा संतप्त भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!