Share

#MPSC : ‘तुमच्या विभागाने तुम्हालाच न विचारता निर्णय घेऊन तुम्ही किती ‘लायक’ आहात हे दाखवून दिले’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

याआधी एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.दरम्यान, आज या परीक्षेची नवी तारीख घोषित करण्यात आली असून आता ही परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे.

सोशल मिडीयावरच नव्हे तर विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागल्याने सरकारवर दबाव वाढू लागला असल्याने आता सरकार MPSC च्या अधिकाऱ्यांना आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले जाऊ लागले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे.

यावर आता भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी साधू संतांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते हाच धागा पकडून भोसले यांनी वडेट्टीवार यांना टोला लगावला. साधुंना नालायक म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार, तुमच्या विभागाने तुम्हालाच न विचारता निर्णय घेऊन तुम्ही किती ‘लायक’ आहात , हे दाखवून दिले आहे असे म्हणत भोसले यांनी टीका केली आहे .

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!