पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर थोड्याच वेळात याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडण्यास सुरुवात झाली होती होती. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राम सातपुते यांना पोलिसांनी अटक केलेली होती.
यानंतर आज मध्यमांशी बोलतांना राज्यसरकारवर टिका केली आहे. ते म्हणाले की ‘राज्याच्या समोर सरकारचा सर्व गोंधळ उघढा झाला आहे, सर्कार प्रत्येक गोष्टीमध्ये दड़पशाही करते आहे, सरकार प्रत्येक गोष्टीत विश्वासघात करतय. शेतकरयाच विज बिल, मराठा आरक्षण, धनगाराचे आरक्षणात सर्व समाजाच्या तोंडाला पान पुसली आहेत. काही दिलेल नाही, ह्या सरकारच्या विरोधात लोकांच्या भावना तीव्र झाल्याया आहेत.’ अस ते म्हणाले.
काल काय झाल, मी जेंव्हा विद्यार्थ्या सोबत रस्त्यावर आंदोलनाला बसलो, मी काय पाकिस्तान मधून आलोय का? अफगानिस्थान मधून आलोय काय? मी काय लादेन आहे काय? रस्त्यावरती बसल्या नंतर ५०० ते १००० पोलिस येतात. तेथील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला,त्यांना पोलिस थाबू देत न्हवते, माझ्याबरोबर जे विद्यार्थी समर्थक होते ते लादेन समर्थक होते का? असा सवाल त्यांनी केला आहे. हे सरकार कुठल्याही बाबतीत गंभीर नाहीये असाही त्यांनी यावेळी संगीतल आहे.
१४ तारखेला परीक्षा होणार म्हणून, सात दिवसामध्ये जे विद्यार्थी या सेंटर वर येउन थांबली आहेत, जे गरजू मुलं आहेत त्या मुलांना प्रत्येकी २० हजार रूपये भत्ता दया अशी विंनती मी करतो. तसेच कोरोना काळात तुम्ही परीक्षा वाढवलेल्या आहेत त्याच्यासाठी २ वर्ष वयोमर्यादा वाढवून दया अस ते या वेळी म्हणाले आहेत. दरम्यान आता एमपीएससीची परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- वनमंत्री पदावर काम करण्यासाठी हरिभाऊ राठोड यांचे उद्धव ठाकरेंना पत्र
- विराट अनुष्काचा सोशलवर रोमँटिक अंदाज
- पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी !
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !


