Share

आत्महत्या केलेल्या भावाचा अंत्यविधी करून घरी परतल्यानंतर चुलत भावाचाही मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

जालना : आत्महत्या केलेल्या तरुणाचा अंत्यविधी करून घरी परल्यानंतर त्याच्या चुलत भावाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी शहरातील योगेश्वर कॉलनीत घडली. अमोल सुनील तिळवणे (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर श्याम नारायण तिळवणे (२५) असे अमोलच्या अंत्यविधीनंतर मृत्यू झालेल्या चुलत भावाचे नाव आहे.

याविषयी अधिकची माहिती अशी की, अमोल सुनील तिळवणे नावाचा तरूण जालना शहरातील योगेश्वर कॉलनीत राहत होता. गुरुवारी त्याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणावर रात्री ८ वाजेच्या सुमारास अंत्यविधी होत असतानाच त्याचा चुलत भाऊ श्याम नारायण तिळवणे याचा आजारामुळे मृत्यू झाला. दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे तिळवणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, जालना शहरातील मूळ कुच्चरवटा भागातील रहिवासी असलेला अमोल तिळवणे हा सध्या योगेश्वरी कॉलनीतील सुधाकर झांबर्डे यांच्याकडे किरायाने राहत होता. दुपारी शेजारी राहणाऱ्यांनी आवाज देऊनही त्याने दरवाजा न उघडल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता अमेालचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हाyouth suicide रुग्णालयात पाठवला असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!