औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनपा व जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र नागरिकांकडून अजूनही कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने गुरुवारी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी हे स्वत: रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नागरिकांवर कारवाई करत मोठ्या आणि प्रसिद्ध व्यावसायिकांना, दुकानदारांना, हॉटेलचालकांना दंड करत दुकाने बंद करण्याचे आदेश दिले.
मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखील गुप्ता व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोना जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यावेळी त्यांनी थेट क्रांती चौक, रेल्वे स्टेशन, बाबा पेट्रोल पंप, गुलमंडी, पैठणगेट, रोशन गेट भागात दुकान, हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली.
यावेळी क्रांतीचौकातील प्रसिद्ध मनुभाई मिठाई दुकानातील कर्मचाऱ्यांनी व चालकाने कोरोना चाचणी केली नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तातडीने कोरोना टेस्ट करण्यास सांगुन चाचणी केल्याशिवाय दुकान न उघडण्याचे आदेश दिले. डिग जाम या दुकानातील ऑक्सीमीटर व थर्मलगन बंद असल्याने दुकानदाराकडून २००० रुपये दंड वसूल केला. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या व्हिनस दुकानदाराला ४०००, क्लासमेंट दुकानाला २०००, खन्ना एजन्सीला २०००, स्वाद हॉटेलला २०००, मास्टर बिग २०००, विट्स हॉटेलला ५000, तिरुपती हॉटेलला १९,०००, हॉटेल न्यू पंजाबला ५००० रुपये दंड आकारण्यात आला. यापुढे नियमांचे पालन न केल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- लवकरच आई होणाऱ्या श्रेया घोषालला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- आत्महत्या केलेल्या भावाचा अंत्यविधी करून घरी परतल्यानंतर चुलत भावाचाही मृत्यू
- एमपीएससी आंदोलन प्रकरणी पडळकरांसह विश्रामबाग पोलीस ठाण्यात 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- ‘पंतला एकटयाला सोडा’ ; रोहित शर्माने केली विनंती
- महसूल पथकाच्या अंगावर टिप्पर घालणाऱ्या आरोपीच्या पोलिसांच्या हातावर तुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
