🕒 1 min read
पुणे: पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर अनेक आरोप निशाना साधला आहे.
१४ मार्च रोजी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात अधिवेशन, आरोग्य विभागाची भरती आणि मोठमोठे लग्नसमारंभ पार पडतात. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ आहे, असा सवाल विचारत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्यादृष्टीने अन्यायकारक असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
एमपीएससी परीक्षा लांबणीवर पडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी MPSC परीक्षेबाबत अशाप्रकराची अनिश्चितता योग्य नाही. विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा. राज्यात अधिवेशन आणि लग्नसमारंभ पार पडतात. मग एकट्या विद्यार्थ्यांनाच शिक्षा देणे योग्य नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. हे विद्यार्थी भावी प्रशासकीय अधिकारी आहेत. ते परीक्षेच्यावेळी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारने MPSCच्या विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय : राम सातपुते
- परभणीमध्ये कुऱ्हाडीने मारहाण करून पायाची बोटे तोडली
- MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी : पंकजा मुंडे
- जायकवाडीची पाणीपट्टी थकवणाऱ्या औरंगाबाद ‘मनपा’वर कारवाई करणार कोण?
- विनामास्क फिरणार्याकडून महापालिकेच्या कर्मचार्यास मारहाण

