Share

पंकजा मुंडेंना झटका, बीड डीसीसी निवडणुकीतून विद्यमान अध्यक्षांचीच माघार

Published On: 

बीड: येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी केवळ १६ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता आठ जागांसाठी तब्बल ४१ उमेदवारांत निवडणूक होणार आहे. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांनीही माघार घेतली. जिल्हा बँकेचे राजकारण माजी आ.अमरसिंह पंडित, राजाभाऊ मुंडे, सुभाषचंद्र सारडा यांच्याभोवती फिरत आले आहे. मात्र, १९९५ नंतर पहिल्यांदाच बँकेत सारडा कुटुंबातील एकही व्यक्ती नसणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदांसाठी २० मार्च रोजी निवडणूक होत आहे. सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांसाठी ८७ जणांनी उमेदवारी दाखल केली होती;परंतु लेखापरीक्षणाच्या अटीमुळे एकही उमेदवार पात्र ठरू शकला नाही. अपात्र उमेदवारांनी लातूरच्या विभागीय सहनिबंधकांसह सहकार मंत्र्यांकडे धाव घेतली;परंतु दोन्ही ठिकाणी त्यांची निराशा झाली. त्यामुळे ११ जागा रिक्तच राहणार आहेत.

उर्वरित आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडून येणाऱ्या आठ संचालकांना गणपूर्तीअभावी कारभार पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता धूसर असली तरी निवडणुकीत मात्र चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या ८ मतदारसंघांत मिळून ४१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. १२ मार्च रोजी चिन्हांचे वाटप होणार असून २० मार्च रोजी मतदान व २१ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!