लातूर : राज्य शासनाने गुटखा प्रतिबंधित केलेला असताना सुद्धा जिल्ह्यात गुटख्याची विक्री सर्रास चालू आहे. या गोरख धंदयाला चाप देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पाच ठिकाणी धाडी टाकत. एकूण १ लाख ७९ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाई नंतर गुटखा विकण्यावर छाप बसणार असल्याचे बोलल्या जात आहे.
राज्यात मागील काही वर्षांपासून गुटखा बंदी करण्यात आली आहे. तरी काही समाजकंटक गुटखा गुजरात मार्गाने आणून राज्यात विकण्याचा प्रयत्नात असतात. या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी राज्य अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. येणाऱ्या काळात अशा आणखी कारवाया होणार असल्याची हे शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाई एकूण पाच ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. ही कारवाई अचानक झाल्याने कारवाईला संपूर्ण यश आले आहे.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या बळावर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे ही बोलले जात आहे. इतका मोठ्या प्रमाणावर गुटक्याचा साठा जप्त केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोन दुचाकीसह चोरट्यांनी कार लांबवली
- सचिन म्हणतो, किती अंडी खावी लागतील ?
- कार खरेदी करताय ! हुंदाई च्या या गाड्यांवर मिळावा तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट
- मोठी बातमी : राज्यातील ‘या’ शहरात १५ तारखेपासून कडक लॉकडाऊन
- OPPS!! जान्हवी कपूरने कारमध्ये बदलले कपडे; स्वत: शेअर केले फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

