🕒 1 min read
लातूर: राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे काही कडक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर बंदी आणण्यात आली आहे. त्यात मंदिरांचाही समावेश करण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिरांमध्ये गर्दी होऊ शकते म्हणून बरेच मंदिरं दर्शनासाठी बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनाचा होणारा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.
यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त लातूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदीर बंद राहणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त निघणारी यात्रा सुद्धा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी ठराविक मंडळींच्या उपस्थितीत कोरोनाचे नियमाचे पालन करत विधिवत पूजा करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री गवळी समाजातर्फे केला जाणारा दुग्धाभिषेक केवळ ५ व्यक्तींच्या उपस्थितीत होईल. यासाठी मंदिर विश्वस्ताकडून त्यांना पास दिले जाणार आहेत.
भक्तांना प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेता येणार नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून देवदर्शन घेता येणार आहे. देवस्थानतर्फे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यणार आहे. बुधवारी रात्री १०:३० वाजल्या पासून हि सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व भक्तांना www.facebook.com/Siddheshwarratneshwarlatur<http://www.facebook.com/Siddheshwarratneshwarlatur> या फेसबुक पेजवर अॉनलाईन दर्शन घेता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने दिली टीम इंडियाची सगळ्यात मोठी अपडेट
- ‘तुफान’ची रिलीझ डेट जाहीर; ‘तुफान उठेगा’ म्हणत फरहानने केले टि्वट
- लोकं काही सुधारेनात…नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर… अनेक शहरात कडक निर्बंध लागू
- बीएमडब्ल्यूने लाँच केली भारतीय बनावटीची पहिली कार
- दोन दुचाकीसह चोरट्यांनी कार लांबवली


