Share

मोठी बातमी : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

Published On: 

मुंबई : भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. मृतदेह बाहेर काढला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल बांधलेले होते.

मनसुख हिरेन हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे खाडीत त्यांचा मृतदेह आढळल्याने मृत्यूचं गूढ वाढलं आहे. अशातच याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या मुलानं केली आहे. आज एटीएसचं पथक चौकशीसाठी मनसुख हिरेन यांच्या घरी गेलं होतं. त्यावेळी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं हिरेन यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.

दरम्यान आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. आज एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं.

त्यावेळी मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरेन यांच्या कुटुंबियांनी केला होता. आज अखेर विमला हिरेन यांच्या फिर्यादिवरुन मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी पोहोचलं होतं. त्यावेळी हिरेन कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले. आज झालेल्या चौकशीमध्ये हिरेन यांच्या कुटुंबियांनी एटीएसला ही आत्महत्या असू शकत नाही, हा खून असल्याचे सांगितले. तसेच यावेळी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या मुलानं केली आहे.

आतापर्यंत या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, आता मनसुख हिरेन यांचा मुलगा एटीएसच्या पथकासोबत गेला असून आता याप्रकरणी कुटुंबियांच्या वतीनं हत्येचा गुन्ह्या दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, एटीएसच्या पथकानं मनसुख हिरेन यांच्या घरी तब्बल साडेतीन तास चौकशी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!