Share

‘राज्य सरकार गोंधळलेले असताना कोणती चांगली काम केली?’

Published On: 

बीड : अतिवृष्टी नुकसान भरपाईतही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असे सर्व असतानाही आमचे शासन म्हणुन तुम्ही स्वतःच आपली स्तुती करून घेत आहात. पूजा चव्हण प्रकरणामुळे महिलांविषयी त्यांच्या सुरक्षिता व न्यायाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इतकी गोंधळलेले सरकार असताना कोणती चांगली काम केली असा सवाल करीत आ. सुरेश धस यांनी सरकारवर टिकेची तोफ डागली व अभ्यासपुर्ण भाषणाने आ. सुरेश धसांनी सभागृह गाजवत कोरोनासह अनेक मुद्यांवरून सरकारवर घणाघाती टीका केली.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात बीड जिल्ह्यातील आष्टीचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि कोरोनाशी लढताना अपयशी ठरलेले सरकार यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांनी अभ्यासपुर्ण परंतु आपल्या नेहमीच्याच आक्रमक व रांगडया शैलीत भाषण करीत या भागातील विविध विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.

ऊसतोडणी कामगारांच्या विम्याचा, आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्याचप्रमाणे ज्या वळी कोरोनाच्या संकटात रुग्णसेवा देण्यासाठी कोणी तयार होत नव्हते त्या वेळी आमच्या गोरगरीब घरातील तरूणांनी आपल्या जीवाची बाजी लावत रूग्णसेवा केली. पाटोदा तालुक्यात तर १०७ गावांत मिळून केवळ पावने अकरा लाख रूपये भरपाई आली व अनेक ठिकाणी तर दमडीचीही मदत मिळाली नाही, वाळूगटाच्या बाबतीतही मराठवाड्यावर व जिल्ह्यावर अन्याय झाला. त्यामुळे गरीबांच्या घरकुलाचे स्वप्न अपुर्ण राहीले आहे. अन्नधान्य योजनेतही जुन्याच कंत्राटदारांना काम दिली गेल्याचाही आरोप आ. धस यांनी केला. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महामारी नियंत्रणात कशी, असा सवालही त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!