🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनोख्या पद्धतीने त्याचा विरोध दर्शवला. इलेक्ट्रिक स्कूटर चालवत त्या राज्य सचिवालय नबान्न येथे पोहचल्या. ममता यांनी स्कूटर चालवण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी त्यांचा तोल जात पडता पडता वाचल्याचे दिसून आले. यावरून पंतप्रधान मोदी यांनी ममतांना टोला लगावला आहे.
ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी रस्त्यावर स्कुटी चालवली. तेव्हा तुम्ही सुखरुप राहावे, अशी प्रार्थना सगळे करत होते. नशीबाने तुम्ही पडल्या नाहीत. अन्यथा ज्या राज्याची स्कुटी आहे, त्यांच्याशी तुम्ही शत्रुत्त्व पत्कारले असते. मात्र, आगामी निवडणुकीत नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची स्कुटी पडेल, असे म्हणत मोदींनी ममतांची खिल्ली उडवली.
Some days back, when you (Mamata Banerjee) rode a scooty, everyone was praying that you are not hurt. It is good that you didn't fall, otherwise, you would have made enemy the state where the scooty was manufactured: PM Narendra Modi in Kolkata (1/2) pic.twitter.com/rO8Dw375kR
— ANI (@ANI) March 7, 2021
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विविध पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केले आहेत. पंतप्रधान मोदी यांची बंगालमध्ये पहिली प्रचार सभा पार पडली. या सभेसाठी प्रचंड गर्दी जमली होती. ब्रिगेड परेड ग्राऊंडमधून त्यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेची फसवणूक केलीय. पण आता काळजी करू नका. येत्या निवडणुकीत तुम्हाला परिवर्तन करण्याची संधी आहे. तेव्हा यावेळी आपण ‘जोर से छाप, टीएमसी साफ’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतांवर निशाना साधला.
मोदी म्हणाले, तृणमुल हे काँग्रेसचेच गोत्र आहे. तर भाजपच्या मुळात बंगालची महक आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीत कमळाचे बटन दाबून कमाल केली. आताही तीच वेळ आली आहे. एका मताची किंमत काय आहे ती आपण काश्मीरपासून अयोध्येपर्यंत पाहिली आहे. यावेळेसही आपण कमळाचे बटन दाबून टीएमसीचा सुपडा साफ करा, असे आवाहन मोदींनी केलं.
महत्वाच्या बातम्या
- ..म्हणून मला अंबानी-अदाणीबद्दल सहानुभूती, पंतप्रधान मोदींचा खुलासा
- ‘जोर से छाप, टीएमसी साफ’, मोदींचा बंगालमध्ये नारा
- ‘राज्य सरकार गोंधळलेले असताना कोणती चांगली काम केली?’
- आक्रमक, रांगडया शैलीतील भाषणाने आ.धस यांनी विधिमंडळात लक्ष वेधले
- ‘विधिमंडळातील ‘ते’ वक्तव्य चुकीचे, मुख्यमंत्र्यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

