Share

मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा

Published On: 

पुणे– 22 वर्षीय पूजा चव्हाणचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राठोडांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपावला होता.

शिवसेनेच्या बड्या नेत्याचे नाव आल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता.भाजपच्या महिला आघाडीने या प्रकरणी राज्यभर आंदोलने केली.भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने राठोड यांना राजीनामा द्यावा लागला असल्याचे दिसून आले आहे.

राज्यभर हे प्रकरण गाजत असताना आता या प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट आला आहे. भाजपच्या एका नगरसेवकाचे आता या प्रकरणात नाव आले आहे. या नगरसेवकाने या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आणि माहिती असलेला लॅपटॉप चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. वानवडीचे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी लॅपटॉप चोरल्याचा आरोप आहे.

पुजा चव्हाणच्या मृत्युनंतर तीचा लॅपटॉप नगरसेवक धनराज घोगरे यांनी गायब केल्याचा आरोप करत याबाबत तशी तक्रार शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी बीड पोलिसांकडे दिलीय. दरम्यान, आता धनराज घोगरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

”वानवडी परिसरात इमारतीवरुन उडी घेऊन तरुणीनं आत्महत्या केल्याचं मला कळालं तसं मी तातडीनं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो होतो. तिला उचलून मी फक्त रिक्षात ठेवलं आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. मोबाइल आणि लॅपटॉपचं मला माहित नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या” असं धनराज घोगरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!