🕒 1 min read
मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. गेले तीन दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधकांनी राज्य सरकारवर आरोपांची सरबत्ती केल्याचं दिसून आलं. यानंतर, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेमध्ये उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने राम मंदिर निधी संकलनासाठी राबवलेल्या अभियानावर टीकास्त्र सोडलं आहे.
काल विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी बाबरी मशिदी देखील वक्तव्य केलं होतं. हेच वक्तव्य त्यांना आता भोवणार असल्याचं चित्र निर्माण होत आहे. ‘ उद्धव ठाकरे विसरले आहेत की ते मुख्यमंत्री आहेत. आता मुस्लिम मंत्र्यांनी लाज बाळगून राजीनामा द्यावा,’ असं समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी म्हणाले आहेत.
अधिवेशनात हिंदुत्वाच मुद्दा निघाल्याने बाबरी मशीद व राम मंदिराच्या मुद्यावरून देखील त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच, बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानाचा देखील त्यांनी सभागृहात पुनरुच्चार केला होता. मात्र, या विधानांवरून सत्ता स्थापनेवेळी पाठींबा देणारे अबू आझमी आता चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आलं आहे.
‘उद्धव ठाकरे विसरले आहेत की ते मुख्यमंत्री आहेत. बाबरी मशीदीत मूर्ती ठेवणं आणि मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. जर मुख्यमंत्री गुन्हेगारी कृत्य स्वीकरत असतील तर हे दुर्दैवी आहे. मला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सांगावं वाटत आहे की, हे सरकार किमान सामायीक कार्यक्रमावर बनलेले आहे. मात्र इथं मंदिरं व मशीदींवर चर्चा होत आहे. त्यामुळे भविष्यात कशा पद्धतीने पुढे जाणार यावर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
तर, ‘मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सीएए-एनआरसी लागू करणार नाही, काँग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसने असे म्हटले होते की, मुस्लिमांसाठी ५ टक्के आरक्षण असेल, आता ते सत्तेत आहेत. मुस्लीम मंत्र्यांना थोडी लाज वाटायला हवी आणि त्यांनी राजीनामा द्यावा’ असं भाष्य अबू आझमी यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारला लाज वाटायला हवी’ इंधन दरवाढीवरून प्रकाश राज आक्रमक !
- श्रुती मराठेच्या अदांवर चाहते घायाळ ; सोशल मीडियावर श्रुतीचा जलवा !
- प्रभू श्रीरामांनी भाजपला टोल वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय का ? नाना पटोलेंच्या टीकेनंतर सभागृहात गोंधळ
- पूजा चव्हाण प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट; भाजपच्या ‘या’ नेत्याने पूजाचा लॅपटॉप चोरल्याची चर्चा
- संचारबंदी काळात व्यापाराना दिलासा देणारी बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
