औरंगाबाद : सध्या कोरोनाचे संकट औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा १५ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस जोर धरत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोंणाने जोर धरला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागाबरोबरच शाळेतही कोरोना रुग्ण आढळून येत आहे. जिल्ह्यातील 49 शाळेत 61 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शाळा जिल्हा परिषद मार्फत शाळा बंद करण्याच्या हालचाली जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील जिप पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षकांना एक दिवसाआड शाळेत बोलावणार आहे. तर 1ली ते 9 आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येणार आहे. आश्रमशाळेत देखील 10 वगळता सर्व वर्ग बंद करण्यात येणार आहे. शनिवार, दि. ६ मार्चपासून ग्रामीणच्या शाळा 19 तारखेपर्यंत बंद राहण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत ही चर्चा झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांनी दिली. तर लवकरच याबाबत सूचना जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
- एसटी अधिकाऱ्याला शिवीगाळ; ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांना ठोकल्या बेड्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ लागू, अजित पवारांची घोषणा
- औरंगाबाद जि.प. सभा; उपाध्यक्ष सचिवांवर भडकले आणि..
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
