मुंबई : समाज माध्यमे मध्ये नेहमीच ग्राहकांना नवनवीन अद्ययावत सेवा दिल्या जातात. यामध्ये नुकताच ट्विटर ने देखील एक नवीन बदल केला होता. मात्र आता ट्विटरकऱ्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. ट्विटरकऱ्यांना आता ट्विटरवर काही सेवांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
ट्विटर एक नवे सेफ्टी मोड चे ट्रायल करत आहे. त्यामुळे या खास सर्विस सुपर फॉलो सर्विससाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत. हे एक पेड सब्सक्रिप्शन बेस्ड असणार असून सुपर फॉलो नावाने त्याला ओळखले जाणार आहे. याअंतर्गत कंटेट आणि हाय प्रोफाइल एकाउंट एक्सेस करण्यासाठी पेमेंट करावे लागणार आहे. या फिचर सर्विसच्या माध्यमातून ट्विटरला आपल्या रेवेन्यूमध्ये नफा होणार आहे. त्याचसोबत कंटेट क्रिएटर्सला सुद्धा यामधून पैसे मिळू शकतात. परंतु हे फिचर कधी लॉन्च केले जाईल याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्याचसोबत भारतातील लॉन्चिंग बद्दल ही काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
ट्विटरच्या नव्या सुपर फॉलो सर्विसच्या माध्यमातून क्रिएटर्सला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कमाई करता येणार आहे. यासाठी कंटेट क्रिएटर्स आपल्या फॉलोअर्सच्या माध्यमातून प्रतिमहिना 4.99 डॉलर्स (जवळजवळ 350 रुपये) प्रमाणे चार्ज करु शकतात. म्हणजेच ट्विटरवर फॉलोअर्सला खास कंटेट पाहण्यासह न्यूजलेटर मिळवण्यासाठी प्रत्येक महिना 350 रुपये शुल्क मोजावा लागणार आहे. यामध्ये ट्विटरची सुद्धा हिस्सेदारी असणार आहे. पण ट्विटरकडून त्यांच्या भागीदारी बद्दल सुद्धा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. या सेवेला कम्युनिटीज नावाने ओळखले जाणार आहे. हे एक फेसबुक ग्रुप फिचर्ससारखेच असणार आहे. लोकांना खास इवेंटससाठी ग्रुप तयार करता येणार असून त्यात अन्य लोकांना सुद्धा अॅड करता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणं हा मर्दपणा नाही,अशा लोकांना लाज वाटायला हवी’
- श्रुती मराठेच्या अदांवर चाहते घायाळ ; सोशल मीडियावर श्रुतीचा जलवा !
- अहमदपूरात शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा एकर उस जळून खाक
- पूजा चव्हाण प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट; भाजपच्या ‘या’ नेत्याने पूजाचा लॅपटॉप चोरल्याची चर्चा
- संचारबंदी काळात व्यापाराना दिलासा देणारी बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
