🕒 1 min read
जालना: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर लस घेतली. तसेच, तसेच ज्यांच्यासाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्या सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही दानवे यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील आठ शासकीय व तीन खासगी केंद्रांत बुधवारी ८७० जणांनी कोरोनावरील लस टोचून घेतली. यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपेक्षा ४५ ते ६० वयोगटातील आजारी व ६० हून अधिक वयाच्या वृद्धांमध्ये लसीकरणासाठी अधिक उत्साह पाहावयास मिळाला.
सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा – दानवे
“माझ्या लोकसभा मतदारसंघातील जालना येथिल जिल्हा रुग्णालयात जाऊन आज कोविड-१९ ची लस घेतली. ही लस पुर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी ही लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हा. अफवांवर विश्वास ठेवू नका. लस जरी घेतली, तरी मास्क लावा, सँनिटायझर वापरा व सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळा”, असे आवाहन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
जिल्ह्यात १९२ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू
जालना जिल्ह्यात बुधवारी रेकॉर्डब्रेक १९२ नवे रुग्ण आढळले आले, तर दोघांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ३९८ वर पोहोचली आहे, तर एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार ८९३ वर जाऊन पोहोचला आहे. यामुळे कोरोनाला रोखण्याचे आव्हान जालनेकरांसमोर उभे राहिले आहे.
बुधवारी आढळलेले नवे रुग्ण
जालना १०९, अहंकार देऊळगाव १, नेर १, सावरगाव ३, भाटेपुरी १, कारला १, वखारी १, पीरपिंपळगाव १, मंठा १, वाई १, तळणी १, परतूर १, घनसावंगी १, भुतेगाव १, कुंभार पिंपळगाव ३, राजाटाकळी १, अंबड ११, भराडी १, कावडगाव १, जोगेश्वरवाडी १, महाकाळा १, बदनापूर १, शेलगाव ४, चितोडा १, कंडारी १, अन्वी १, जाफराबाद शहर २, वरुड २, किन्होळा १, गोंदखेडा १, कुंभारझरी १, टेंभुर्णी २, निमखेडा १, माहोरा १, भोकरदन शहर ३, फत्तेपूर १, लेहा १, बरंजळा लोखंडे १, कोडोली १, आलापूर २, जवखेडा १, मोहलाई १, लोणगाव २, चांदई १ तसेच बुलडाणा ११, औरंगाबाद १ तर परभणी ४ अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीद्वारे १७७ व अँटिजनमधून १५ असे मिळून एकूण १९२ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.
काही नागरिकांकडून निष्काळजीपणा
जिल्हा प्रशासनाकडून नियमित मास्क लावा, वारंवार हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, फिजिकल डिस्टन्स पाळा, असे आवाहन करण्यात येत आहे. तर राज्य सरकारनेही “माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार’ अशा साद घालून लोकांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठी साद घातली आहे. स्थानिक प्रशासनही नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करत असून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र झटत असताना काही जण निष्काळजीपणे वावरत असून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टरची महिलेकडे शरीरसुखाची मागणी
- घोडयावरून येण्यास तयार असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचे पुन्हा एक पत्र, म्हणाला..
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! एकाच दिवसात वाढले ३७१ रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
- महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी औरंगाबादच्या प्रियंका गारखेडेची निवड
- रेल्वे प्रश्नासाठी मराठवाड्यातील खासदारांची एकजूट; रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
