🕒 1 min read
औरंगाबाद : कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्याच्या नावाखाली डॉक्टरने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील पदमपुरा कोविड सेंटरमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. बदनामीच्या भीतीने या महिलेने पोलिसांत तक्रार देणे टाळले. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यावरून आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ या डॉक्टरचे काम थांबवले.
दरम्यान, संबंधित महिला २३ फेब्रुवारी रोजी पदमपुरा येतील मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती झाली. त्यानंतर ३ मार्चला उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज मिळणे अपेक्षित होते. दरम्यान, २ मार्च रोजी या सेंटरमध्ये कामाला असलेल्या डॉक्टरने मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमासार महिलेला केबिनमध्ये बोलावून घेतले. ‘तुमचे डिस्चार्ज पेपर तयार करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला आणखी तीन दिवस इथे थांबावे लागेल,’ असे त्याने महिलेला सांगितले. त्यावर महिलेने उद्याच डिस्चार्ज द्या, अशी विनंती केली. त्यावर ‘तुझी विनंती मान्य करायची असेल तर मी सांगतो तसे कर’ असे म्हणत या डॉक्टरने संबंधित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.
दरम्यान, महिलेने डॉक्टरला नकार दिला आणि आपल्या वार्डात परत गेली. त्यानंतरही डॉक्टरने महिलेला दोन कॉल केले. यानंतर घाबरलेल्या महिलेने तात्काळ नातेवाकांना फोन कडून डॉक्टर त्रास देत असल्याचे सांगितले. तसेच महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली. त्यांनी याबाबत चौकशी करून संबंधित डॉक्टरचे काम तात्काळ थांबवले.
नातेवाईकांचा डॉक्टरला चोप
दरम्यान, बुधवारी सायंकाळी ४ वाजता डॉक्टर काविड सेंटरमध्ये आला. त्यावेळी रुग्ण महिलेसोबतच्या काही रुग्णांनी त्याला जाब विचारला. मात्र, डॉक्टर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर संबंधित महिलेसह काही रुग्णांनी डॉक्टरला चोप देत धडा शिकवला.
महत्त्वाच्या बातम्या
- घोडयावरून येण्यास तयार असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचे पुन्हा एक पत्र, म्हणाला..
- ‘त्या’ एक हजार ३०५ अतिक्रमणांवर बुलडोजर चालवणार-एकनाथ शिंदे
- ‘लाचारी करून मिळालेल्या सत्तेने लाटही येत नाही आणि ती टिकत ही नाही’
- अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतही संभाजीनगरचा नारा; शहराला निधी देण्याचीही केली मागणी
- धक्कादायक! कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही दोघांना कोरोना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
