🕒 1 min read
मुंबई: आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली.
आयपीएल लिलावानंतर खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांसह ही आयपीएल खास असणार आहे. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच आयपीएलचं आयोजन हे भारतात केलं जाणार आहे. दरम्यान आयपीएलचा थरार हा भारतातील 6 राज्यात रंगणार आहे. याआधी फक्त 5 शहरांची नावं निश्चित होती. तर मुंबईबाबत निर्णय झाला नव्हता. पण सरकारने परवानगी दिल्याने आता मुंबईलाही आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे आता मुंबईसह, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकातामध्ये सामन्यांचं आयोजन करण्यात येणार आहे.
आयपीएलचे सामने कधी खेळवले जाणार याबद्दल सु्द्धा अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. मात्र अशी अपेक्षा केली जात आहे की, आयपीएलचा 14 वा सीजन 8 ते 12 एप्रिल दरम्यान सुरु होऊ शकतो. त्याचसोबत मे किवा जून पर्यंत सुद्धा ते खेळवले जाऊ शकतात.
18 फेब्रुवारीला झालेल्या आयपीएल ऑक्शनच्या वेळी फ्रेंचायजीज यांना असे सांगितले गेले होते की, 14 व्या सीजनमधील बहुतांश सामने हे पुणे आणि मुंबईत होऊ शकतात. तर प्लेऑफ मुंबईत खेळवले जाऊ शकतात. परंतु इंग्लड सीरिजच्या तिसऱ्या टेस्ट दरम्यान अहमदाबाद मध्ये गेल्या आठवड्यात एक बैठक झाली. त्यामध्ये बोर्डाचे सचिव जय शाह, कोषाध्यक्ष अरुण धुमळ, आयपीएल गवर्निंग काउंसिलचे अध्यक्ष बृजेश पटेल आणि अंतरिम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमीनसह बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच मुंबईतील वेन्यू बद्दल ही चर्चा झाली.
महत्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्सची धाड
- खास फीचर्सने ग्राहकांना आकार्षित करणाऱ्या रेनो किगरची डिलीव्हरी सुरु
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
