Share

नोकरीचे आमिष दाखवून महाठगाने सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयाला गंडविले, मोठे रॅकेट असल्याचा संशय

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे शिकून सवरून आपल्या कुटुंबियांना काहीतरी फायदा होईल या उद्देशाने अलीकडच्या काळातील सुशिक्षित बेरोजगार तरुण हे एखाद्या माथेफिरूच्या बोलण्याच्या शैलीला फसतात. याचेच उदाहरण मंगळवारी (ता.२ ) कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील तरुणांनी उघडकीस आणला. या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या १ ते २ महिन्यापासून दिपक दिलीप कसबे (वय-३५, रा.दिपेवडगाव ता.केज जि.बीड) याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना ‘मी गिरीकंद ट्रॅव्हल्स मध्ये मोठ्या पदावर काम करतो. रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर व वॉर्डबॉयची मोठी भरती करावयाची आहे. त्याकरिता आपल्याला प्रथम ५००० रुपये तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड आणि ड्रायव्हिंग लायन्सेसची सत्यप्रत घेवून पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये नियुक्त पत्र, ड्रेस, ओळखपत्र देतो असे सांगितले. यावरून संबंधित फसलेले तरुण पुणे येथे ठरलेल्या ससून हॉस्पिटल येथे गेले असता या महाठगाने नियुक्ती पत्र, ड्रेस, ओळखपत्र देण्याचा एक हॉल दाखविला. या ठिकाणी या तरुणांना शंका आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळात नाेकरीचे आमिष दाखविणारा महाठग या ठिकाणाहून गायब झाला.

या प्रकरणात आमच्या विशेष प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता कळंब, बार्शी, दहिफळ, अंबाजोगाई, दिघोळ अंबा, येरमाळा, केज, वाशी येथील तरुणांचा यामध्ये समावेश असल्याने फसवणूक करणारे मोठे रॅकेट असल्याची शंका व्यक्त होत आहे. सदरील या गायब झालेला महाठग हा त्याच्या मूळगावी सापडला असून त्याची अधिक चौकशी केली असता तो प्रश्नांची समर्पक उत्तरे देवू शकला नाही. त्यामुळे फसलेल्या तरुणांनी त्याला कळंब पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. राजेंद्र पांडुरंग बारगुले यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस स्टेशनमध्ये दिपक दिलीप कसबे याच्यावर रात्री उशीरा कलम ४२०,३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!