Share

औरंगाबाद कृउबाच्या प्रशासक नियुक्तीचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्तीचा सरकारने जारी केलेला आदेश उच्च न्यायालयाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी सोमवारी (दि. १) रद्द ठरवला आहे.
कोरोना संसर्ग वाढत आहे. राज्यातील इतर बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद बाजार समितीच्याही निवडणुका पुढे ढकलण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार सरकारने करावा, असे निर्देशही उच्च न्यायालयाने या वेळी दिले आहेत.

सरकारने मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मार्चपासून तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ही 5 ऑगस्ट 2020 रोजी संपली होती. परंतू कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाजार समितीच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. संचालक मंडळाने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. त्यावर सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सभापती राधाकृष्ण पठाडे व इतर 14 संचालकांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.

त्यावर खंडपीठाने सरकारने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलल्या होत्या. दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने कोणतेही कारण न देता कक्ष अधिकाऱ्याचे एक पत्र काढून औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदत वाढ देता येणार नाही, असे सांगितले. मात्र त्यात यासंदर्भाने कोणतेही कारण दिले नव्हते. तसेच तो निर्णय सरकारचा असल्याबाबतचा कोणताही संदर्भ स्पष्ट होत नव्हता.

त्यामुळे कक्ष अधिकाऱ्यांच्या पत्राच्या अनुषंगाने व सरकारने निवडणुका पुढे ढकलल्याने संचालक मंडळास मुदतवाढ द्यावी, म्हणून दुसरी याचिका दाखल केली. दरम्यान 4 ऑगस्ट 2020 रोजी संचालक मंडळाची मुदत संपली. जिल्हा उपनिबंधक औरंगाबाद यांनी प्रशासकाची नियुक्ती केली. जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला. याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी तर सरकारकडून अ‍ॅड. सुजित कार्लेकर यांनी काम पाहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!