Share

बाळासाहेंबाच्या स्मारकासाठीच्या ४०० कोटींपैकी ३० ते ४० टक्के हेच गिळणार – निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : गेली अनेक वर्षे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईतील महापौर निवासस्थानी करण्याचे नियोजित आहे. आता, बाळासाहेब ठाकरे यांच्या संरकासाठी राज्य सरकारने तब्बल ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. आज (1 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने या निधीस मान्यता देण्यात आली.

यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक विसरले. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या नावावर प्लॉट गिळला. ठाकरे कुटुंब स्वतःची मालमत्ता असल्यासारखा त्या प्लॉटचा वापर करतात आणि स्मारक बनवणाऱ्या ठेकेदाराकडून सुद्धा ४०० कोटीतले ३० ते ४० टक्के गिळणार.’ अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

बाळासाहेबांचं स्मारकाचं काम होणार दोन टप्प्यात –

पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी कामे केली जातील. यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

तर, दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानविषयक कामं केली जाणार आहेत. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्यूअल रियालिटी शो आणि तांत्रिक बाबींवर काम केले जाईल. ही कामे स्मारकाची इमारत अंतिम टप्प्यात आल्यानंतर केली जातील. या कामांसाठी १५० कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!