Share

पालिका भूमिकेवर ठाम! १ एप्रिलपासून लागू होणार परवाना शुल्क

Published On: 

औरंगाबाद : १ एप्रिलपासून शहरातील व्यापार्‍यांना व्यवसाय परवाना शुल्क लागू करण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला आहे. आगामी दोन दिवसांत यास अंतिम मंजुरी मिळणार आहे. यापूर्वी खासगी एजन्सी नेमून त्यांच्याकरवी परवाना शुल्क वसूल करण्याचे ठरले होते. मात्र आता पालिका कर वसुली पथकांकडूनच या नवीनतम करावी वसुली करणार आहे. व्यापार्‍यांचा विरोध असला तरी शासन आदेशानुसार परवाना शुल्क वसूल करावेच लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने पालिका प्रशासनाला सात वर्षांपूर्वीच व्यापार्‍यांकडून व्यवसाय परवाना शुल्क वसूल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी पालिकेने केली नाही. त्यामुळे मध्यंतरी नागपूर येथलेखाकार कार्यालयाने आक्षेप नोंदवत तीव्र नाराजी देखील व्यक्त केली. त्यानंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या लोकलेखा समितीने याची गंभीर दखल घेतली. दोन आठवड्यांपूर्वी पालिकेने समितीस १ एप्रिलपासून कर लागू करणार असल्याचे आश्वासन दिले.

त्यामुळे आता १ एप्रिलपासून परवाना शुल्क वसुलीसाठी पालिकेचा कर मूल्यनिर्धारण विभागाने तयारी सुरू केली आहे. राज्यातील इतर पालिकांमध्ये ज्या पद्धतीने परवाना शुल्काची वसुली केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातही वसुली केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या कर निर्धारक व संकलक अधिकारी अपर्णा थेटे यांनी दिली.

पालिकेच्या तिजोरीत या परवाना शुल्कामुळे वार्षिक किमान 8 कोटी रुपये येतील, असा प्राथमिक अंदाज आहे. शुल्क लावण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिलेली आहे. प्रशासन दोन ते तीन दिवसांत अंतिम मंजुरी देण्याची शक्यता आहे

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!