Share

सुरुवातीच्या ३ दिवसात जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी एकही अर्ज नाही

Published On: 

नांदेड : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज २६ फेब्रुवारीपासून स्वीकारले जात आहेत. मात्र पहील्या दिवशी एकही अर्ज न आला नाही, नतंर असलेल्या सलग अलेल्या सुट्टीमुळे अद्याप एकही अर्ज आलेला नाही. ५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. मंगळवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल.

अर्ज भरण्याच्या पहील्या दिवशी २६ फेब्रुवारी रोजी एकही अर्ज आला नाही. त्यानंतर शनिवार, रविवार तसेच सोमवारी स्थानिक सुटी असल्याने अर्ज स्वीकारले गेले नाहीत. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता प्रारंभ होईल, अशी शक्यता आहे. ५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारी अर्ज भरताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये, तर इतर मतदार संघातील उमेदवारांना २ हजार रुपये अनामत रक्कम भरणा करावी लागणार आहे.

निवडणूक प्रक्रियेत ८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होईल, तर ९ मार्च ते २३ मार्च या कालावधीत उमेदवारी मागे घेता येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया नांदेड उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण केली जात असुन निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण काम पाहत आहेत. उमेदवारांना २४ मार्च रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. तर २ एप्रिल रोजी मतदान आणि ४ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!