Share

६०० कोटींच्या थकबाकीमुळे महावितरणवर ‘महासंकट’

Published On: 

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या कालखंडात महावितरणने वीज बिलाच्या थकबाकीसाठी कोणत्याही वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला नाही. मात्र यामुळे थकबाकीदारांची संख्या वाढीस लागली आहे. मराठवाडयात महानगरपालिका, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक पाणी पुरवठयाच्या १२ हजार ७५४ वीज जोडण्यांचे ५५०.५८ कोटी रूपये थकबाकी आहे. वीज बिलाच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणवर आर्थिक महासंकट येऊन ठेपले आहे.

पाणी पुरवठा ग्राहकांचा थकबाकीसाठी कोणत्याही क्षणी वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये महावितरणने नियमित वीज पुरवठा केला. शिवाय एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणाचाही वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र यामुळे थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मराठवाडयातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील महानगरपालिका, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक पाणी पुरवठयाच्या १२ हजार ७५४ वीज जोडण्यांचे ५५.५८ कोटी रूपये थकबाकी आहेत. वीज बिलाच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणचा आर्थिक गाडा चालविणे अशक्य झाला आहे. महावितरणला वीज खरेदी, वीज वहन, वीज यंत्रसामुग्री खरेदी, उपकेंद्र निर्मिती, देखभाल व दुरूस्ती, व्यवस्थापन खर्च, बँकांचे कर्ज व व्याजाची परतफेड दरमहा आदी खर्चाला सामोरे जावे लागते. यासाठी वीज बिलाच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणला पर्याय नाही.

थकीत वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणच्या व्यवस्थापनाने क्षेत्रिय कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते यांना दिले आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पदाधिकारी यांनी वीज बिल भरण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!