🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार, १ मार्च २०२१) सकाळी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतला. आणखी २८ दिवसांनंतर ते लसचा दुसरा डोस घेतली. पंतप्रधानांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवर ही माहिती दिली. दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोना लसीकरणासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल होऊन कोरोना लसीकरण त्यांनी केलेले आहे. काहीवेळापूर्वीच ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या आहेत.
याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती.
शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
तसेच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत. मात्र कोणती लस कोणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ६०० कोटींच्या थकबाकीमुळे महावितरणवर ‘महासंकट’
- मोदीसाहेब, आता ‘माकडावस्थेत’ जाऊन झाडावरची पान फुल खाऊन जगावं की काय…?
- महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना ‘एक लाख पत्र पाठवा’ आंदोलन
- “ठाकरी बाणा” खुर्चीसाठी एवढा लाचार होऊ शकतो ?
- उमेदवारांनो, ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशोब द्या, अन्यथा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
