Share

५० वर्षे जुन्या तलावाच्या पाळूला गेला तडा; तलाव फुटण्याची भिती

Published On: 

🕒 1 min read

लातूर : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा गावातील सर्वात मोठा असलेला तलाव पुर्ण भरल्याने तलावाच्या पाळूला तडे गेले आहे. या तलावाची निर्मीती १९७२ मध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवरील हा तलाव यंदा पुर्ण भरला आहे. महत्वाची बाब म्हणजे तलावाचा पाळू मोठा असल्याने त्यावर मोठमोठी झाडे उगवली आहे.

शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेल्या कासार बालकुंदा परिसरात १९७२ साली मोठ्या क्षमतेच्या तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाच्या देखभालीकडे परिसरात अलीकडे दुर्लक्ष होत आहे. या तलावाच्या पाळूची रुंदी अधिक आहे. त्यामुळे या पाळूवरच मोठमोठी झाडे उगवली आहेत. या उगवलेल्या झाडांच्या मुळे खोलवर पसरली गेली आहे. या झाडांच्या मुळांमुळे पाळूलाच आता तडा जाऊन भेगा पडल्या आहेत.

पाळूला तडा गेल्याने पाळूवरून पलीकडच्या शेतीत जाणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठी आडचण झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे सांडव्यातून पाणी झिरपून पलीकडे जात आहे. यामुळे सांडव्यांची भिंतही पाणी झिरपून ढासऴण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा धोका वेळीच ओळखून संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाळूची दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे. यावर अभियंता मल्लिकार्जून पाटील यांनी,’आम्हाला तलावाच्या पाळूचे फोटो प्राप्त झाले असुन लवकरच आम्ही दुरुस्तीसाठी प्रयत्न करु. आणि पाळूच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठवणार’ असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!