Share

उमेदवारांनो, ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशोब द्या, अन्यथा…

Published On: 

🕒 1 min read

लातूर : जिल्ह्यात जानेवारी मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने जो खर्च केला आहे त्याचा हिशोब निवडणूक विभागाला द्यावा लागतो. मात्र देवणी तालुक्यातील ५६ उमेदवारांनी अजुनही निवडणूकीचा जमाखर्च दाखल न केल्यामुळे निवडणूक विभागाने जमाखर्च सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जानेवारीमध्ये ३४ गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला होका. यांपैकी कमालवाडी येथील निवडणूक बिनविरोध पार पडली; तर उर्वरित ३३ गावांत ग्रामपंचायतीसाठी निवडणुक पार पडली. कायद्यानूसार निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने जो खर्च केलेला आहे, तो वेळेत निवडणूक विभाग तथा उपकोषागार कार्यालयात विहित नमुन्यात दाखल करणे आवश्यक असते.

निवडणूक विभागाच्या वतीने यासंदर्भात उमेदवारांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र निवडणुका होऊन जवळपास एक दीड महिना झाला तरी लातूर जिल्ह्यातील देवणी तालूक्यातील १६ गावांतील ५६ उमेदवारांनी आपल्या निवडणुकीचा जमाखर्च वेळेत दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक जमाखर्च सादर न केलेल्या उमेदवाराची माहिती जिल्हा प्रशासनास लेखी स्वरूपात कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!